या आधी तुम्ही Online ७/१२ किंवा फेरफार काढले असतील. पण आता जमिनीचे जवळपास सर्वच रेकॉर्डस् (कागदपत्रे) आता Online उपलब्ध झालेली आहे. त्यात महाभूलेख नकाशा (Mahabhulekh Map Maharashtra) म्हणजेच भू नकाशा सुद्धा Online काढता येतो.
महा भू नकाशा म्हणजेच जमीन नकाशा. जसे कि देशाला आणि राज्याला सीमा असते तसेच तुमच्या जमिनीला किंवा प्लॉट ला ही सीमा असते आणि ती सीमा हि महा भु नकाशा महाराष्ट्र मध्ये दिलेली असते.
महा भूमि अभिलेख नकाशा महाराष्ट्र मध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीचा Khata No, Survey No (Plot No), Total Area, Land Owner आणि उत्तर दिशा कुठे आहे हे दर्शिवले असते. ह्या नकाशात तुमच्या आजू बाजूच्या प्लॉट चा नकाशा हि दर्शिविला असतो.
ई नकाशा महाराष्ट्र म्हणजेच जमिनीचा नकाशा बघण्यासाठी येथे क्लिक महाभुलेख नकाशा करा जिथे नागरिक त्यांच्या जमिनीचा किंवा प्लॉट चा महाभुलेख नकाशा (Bhumi Abhilekh Nakasha 7/12) पाहू शकता.
Step 1 – Select Location (ठिकाण निवडा) –
भू नकाशा बघण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या प्लॉट चे ठिकाण निवडावे लागेल. त्या जागेची माहिती निवडा जसे कि State, Category, District, Taluka, Village यानंतर निवडलेल्या ठिकाणचा भू नकाशा तुमच्या समोर येईल.
Step 2 – Select Plot No (प्लॉट नंबर निवडा) –
ठिकाण निवडल्यावर तुम्ही तुमचा Plot No टाकून सर्च करा अथवा सूची मधून तो निवडा अथवा नकाशा मधून निवडा.
Step 3 – Plot Info (प्लॉट माहिती) –
आता तुमच्या समोर Plot Info येईल त्यात तुमच्या माहिती ची सत्यता तपासून बघा. जर का प्लॉट ची माहिती योग्य असेल तर Map Report या बटनावर क्लिक करा.
Step 4 – Plot Report (प्लॉटचा अहवाल) –
भू नकाशा Map Report मध्ये तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध असतात. Single Plot आणि All Plots of Same Owner आपल्या गरजे नुसार या दोन्ही पैकी एक निवडून Show Pdf Report हे बटन दाबावे.
Bhumi Abhilekh Nakasha Plot Report मध्ये तुम्हाला Download आणि Print करण्यासाठी Option येईल.