
ई-मोजणी ( e-Mojni ) हा महाराष्ट्र राज्य शासनाचा एक महत्वपूर्ण असा डिजिटल उपक्रम आहे. ई- मोजणी हे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे जे जमीन महसूल आणि नोदणी संबधित विविध सेवा पुरवते. या सेवेमुळे सामान्य नागरिकांना व शेतकरी वर्गाला शेतीजामिनी सह महसूल विभागातील कामे करण्यास अगदी सोयीस्कर झाले आहे.त्याचबरोबर कामाची गती वाढविण्यासह जमिनीशी संबधित कागदपत्रामध्ये होणारे भ्रष्टाचार आणि कामात होणारा विलंब कमी करण्यास या प्रणाली चा फायदा व्हावा असा या प्रणाली चा हेतू आहे.
ई मोजणीचे महत्व काय आहे ते जाणून घेऊया .
- कार्यक्षमतेत वाढ : ई-मोजणी प्रणाली ने महाराष्ट्रातील जमीनी विषयक कामाना अतिशय वेग निर्माण करून कामाची क्षमता वाढवली आहे.सोबतच या प्रणाली मुळे जमीन नोंदणी किवा महसूल विभागाशी संबधित कामाला लागणारा वेळ पूर्णत कमी केला असून या प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे देणे घेणे आणि डिजिटल स्वाक्षरी घेण्यास सोप्पे झाले आहे. ज्यामुळे जमिनीशी संबधित दस्तऐवज आणि मंजुरी मिळण्याची प्रक्रिया वेगवान होऊन सुरक्षित आणि योग्यरीत्या झाली आहे.
- पारदर्शकता वाढ : ई-मोजणी प्रणालीमुळे जमिनीशी संबधित कामांना वेग तर मिळालाच पण कामामध्ये पारदर्शकता वाढली आहे.ही प्रणाली सर्व व्यवहार आणि मंजुरीसाठी सुरक्षित रेकॉर्ड ची नोंदणी करते.ज्यामुळे नोंदणी अर्जाची सध्या स्तिथी व मंजुरी अर्जाच्या स्थितीचा आढावा घेणे अगदी सोप्पे झाले आहे. या प्रणालीमुळे पारदर्शकता वाढली पण भ्रस्टाचार आणि गैरव्यवहार होण्यास प्रतिबंध लागला.
- सुलभता : ई-मोजणी प्रणालीमुळे जमिनीशी निगडीत सेवा नागरिकांना, विशेषत:ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अतिशय जलद आणि सुलभ बनवल्या आहे. या प्रणालीचा वापर कुठूनही केला जाऊ शकतो, ज्यामुळे नागरिकांना दूरचा प्रवास न करता या सरकारी सेवेचा लाभ घेता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना शासकीय कार्यलयात जाण्याची गरज राहिली नाही, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि खर्च देखील वाचतो.
- फायदेशीर : ई-मोजणी मुळे नागरिकासाठी जमिनी संबधित नोंदणी किवा मंजुरी साठी लागणारे शुल्क कमी केले. या प्रणालीमध्ये ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध असल्याने नागरिकांना शासकीय कार्यालयात वारवार जाण्याची गरज पूर्णत कमी केली आहे सोबत कोणत्याही कामाशी संबधित मध्यस्थी व्यक्तीची गरज नाहीशी झाली. ज्यामुळे नागरिकांना त्यांना अधिकचे शुल्क द्यावे लागायचे.
- व्यवसाय करण्यास सुलभ : या प्रणालीमुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात जाण्याची गरज कमी झाल्याने त्यांना जमीन नोंदणी आणि महसूल संबधित कामासाठी लागणारा वेळ आणि मेहनत कमी होते. ज्यामुळे ते त्याच्या कामावर लक्ष देऊ शकतात. सोबत अनेक तरुण मुलांना या प्रणालीमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
ई-मोजणी पोर्टल काय आहे :
ई-मोजणी पोर्टल एक ऑनलाईन वेबसाईट आहे. जी महाराष्ट्र शाससाने नागरिकांना जमिनीशी निगडीत सेवा सुलभ व सोयीस्कर मिळाव्या म्हणून सुरु केले आहे. या पोर्टल मध्ये कुठूनही ऑनलाईन वापर करून जमिनीशी संबधित दस्तऐवज किवा मंजुरी मिळविणे या सारख्या सेवा सुलभ व गतिशील व्हावे हे उदिष्ट आहे.
ई-मोजणी पोर्टलची प्रमुख वैशिष्ट्य :
- वापरण्यास सोप्पे : ई-मोजणी हे पोर्टल नागरिकांना वापरण्यास अगदी सुलभ आणि सोप्पे होण्यासाठी त्या पोर्टल रचना अगदी साधी केली आहे. ज्यामुळे नागरिकांना जमिनी संबधित आवश्यक सेवा वापरण्यास सोयीस्कर ठरते. पोर्टल चा वापर कसा करायचा याविषयी मार्गदर्शन देखील या पोर्टलच्या माध्यामतून नागरिकांना मिळते. त्यामुळे नागरिकांना योग्य सूची,पर्याय किवा शासकीय फायदे याविषयी माहित मिळण्यास अगदी सोप्पे होते.
- सिंगल पेज पोर्टल : ई-मोजणी पोर्टल जमिनीशी निगडीत सेवासाठी काम करते. नागरिक एकाच पोर्टलद्वारे जमीन नोंदणी आणि महसूल संबधित सेवा सारख्या सुविधा वापरण्याची संधी देते.ज्यामुळे नागरिकांना त्यांनी केलेल्या अर्जाचा आढावा घेणे सोयीस्कर होते.
- ऑनलाईन अर्ज सादरीकरण : ई-मोजणी पोर्टल नागरिकांना त्यांना आवश्यक असलेल्या सेवांचे अर्ज हे कुठूनही ऑनलाईन पद्धतीने भरण्याची मुभा देते.यामुळे नागरिकांचा सरकारी कार्यालयात जाण्याची आणि अर्ज सादर करण्यासाठी लांबचा प्रवास करून लांबच्या लांब रागे मध्ये उभे राहण्याची गरज नाहीशी करते. या प्रणालीमुळे अर्जामधील त्रुटी आणि विलंब कमी होतो.
- अर्जाचा आढावा : ई-मोजणी पोर्टल नागरिकांना त्यांच्या अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी व कोणत्याही प्रकारच्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी पोर्टल लॉग इन करण्याची सुविधा देते.
- दस्तऐवज सुविधा : ई-मोजणी पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्रे अपलोड करणे आणि जमिनीशी संबधित कागदपत्रे डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करते. नागरिक त्यामुळे त्यांना पाहिजे तेव्हा त्यांची कागदपत्रे पाहू शकतात किवा त्याच्या प्रती घेऊ शकतात.
- ऑनलाईन पेमेंट : नागरिकांना कोणत्याही कामासाठी पैसे देण्यासाठी सरकारी कार्यालयात न जाता ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा देते. त्यामुळे नागरिक जमीन नोंदणी,फेरफार आणि महसूल संबधित सेवांसाठी ऑनलाईन शुल्क भरू शकतात. ज्यामुळे भ्रस्टाचार व गैरव्यवहार देखील कमी होतात.
एकूणच, ई-मोजणी हे पोर्टल नागरिकांना वापरण्यासाठी अगदी सोप्पे आणि सोयीस्कर आहे. या पोर्टलद्वारे महाराष्ट्रातील नागरिकांना कुठूनही जमिनी संबधित कामे करता येतात.ऑनलाईन पेमेंट , अर्जाची स्थिती , अर्जाचा मागोवा या सारख्या सुविधा देऊन हे पोर्टल नागरिकांसाठी सुलभ वापरण्यास होते.
ई-मोजणी पोर्टलचा वापर कसा करावा :
ई-मोजणी पोर्टल चा वापर करणे हे अतिशय सोप्पे असून या पोर्टलचा वापर इंटरनेटच्या माध्यमातून कुठूनही करू शकतो. पोर्टलचा वापर कसा करायचा या बद्दल माहिती जाणून घेऊया.
- ई-मोजणी विकल्प निवडा : मुख्य वेबसाईट वर ई-मोजणी विकल्प दिसेल त्यावर क्लिक करा. टे तुम्हाला ई-मोजणीच्या विकल्प मध्ये घेउन जाईल.
- पोर्टलवर नवीन नोंदणी करा : ई-मोजणी पोर्टलचा वापर करण्यासाठी प्रथम तुम्हाला तुमचे खाते तयार करावे लागेल . त्यासाठी नवीन खाते या विकल्पावर क्लिक करा. त्यांतर तुमच्या समोर एक अर्ज दिसेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव , ई-मेल , फोन नंबर व पासवर्ड तयार करून आवश्यक माहिती भरून सबमिट करायचा आहे.
- लॉग इन करा : पोर्टलवर नवीन नोंदणी केल्यानतर पोर्टल वरील सुविधा वापरण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला लॉग इन करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला नवीन खाते तयार करताना वापरलेला ई-मेल व पासवर्ड चा वापर करून लॉग इन करावे लागेल.
- विकल्प निवडा : पोर्टलवर लॉग इन केल्यानतर तुम्हाला आवश्यक त्या जमिनीशी संबधित सेवा वापरण्यासाठी विकल्प निवडावा लागेल. ज्यामध्ये जमीन नोंदणी, महसूल संबधित सेवासह आणखी सेवा उपलब्ध आहेत.
- अर्ज भरा : सेवा निवडल्यानंतर तुमच्या समोर एक अर्ज उघडेल तो अर्ज आवश्यक माहिती सह भरा आणि सबमिट करा. अर्ज सबमिट करण्यापूर्वी भरलेली माहिती अचूक आहे का एकदा तपासा मग सबमिट करा.
- कागदपत्रे अपलोड करा : अर्ज भरून झाल्यानतर आवश्यक टे कागदपत्रे पोर्टल वर अपलोड करा . पोर्टल JPG, PNG आणि PDF सारख्या कागदपात्रांना अपलोड करण्यास अनुमती देते.
- ऑनलाईन पेमेंट : अर्ज व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर तुम्ही निवडलेल्या सेवेसाठी लागणारे शुल्क भरा. त्यासाठी पोर्टल तुम्हाला विविध पर्याय देते ज्यामध्ये डेबिट कार्ड , नेट बँकिग आणि UPI चा समावेश आहे.
- अर्जाचा आढावा : तुम्ही सादर केलेल्या अर्जाची सद्य स्थिती जाणून घेण्यासाठी पोर्टल तुम्हाला सुविधा देते.
एकूणच : ई-मोजणी पोर्टल वापरण्यास अगदी सोप्पे आहे. पोर्टलवर नोंदणी करणे, आवश्यक सेवा निवड, ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, ऑनलाईन पेमेंट करणे व अर्जाची स्थितीचा आढावा घेणे यासारख्या सुविधा समाविष्ट आहे. पोर्टलवर नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या सूचना दिल्या जातात. ज्यामुळे नागरिकांना पोर्टलचा वापर करणे सहज होते.
ऑनलाईन अर्जासाठी लागणारी कागदपत्रे :
वरीलपैकी आवश्यक कागदपत्रांची मूळप्रती व झेंरोक्स प्रती सोबत ठेवाव्या. तुम्हाला आवश्यक असलेले सेवानुसार कागदपत्रामध्ये बदल देखील होऊ शकतो त्यासाठी आपण राज्य सरकारची अधिकृत वेबसाईट पहावी.
प्रमाणपत्र आणि पडताळणी :
ई-मोजणी पोर्टल जमीन संबधित सेवेसह प्रमाणपत्र आणि विविध पडताळणी सारख्या सेवा पण देते. त्यामुळे नागरिकांना कायदेशीर व्यवहार आणि मालकी हक्कासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची विश्वासू पूर्तता करते.
ई-मोजणी पोर्टलवर मिळणारे प्रमाणपत्रे व त्यांची पडताळणी खालील प्रमाणे आहे.
- प्रॉपर्टी प्रमाणपत्र : प्रॉपर्टी प्रमाणपत्र हे अतिशय आवश्यक दस्तऐवज आहे, ज्यामध्ये मालकी हक्काच्या जमिनीची माहिती असते , जस कि जमिनीचे क्षेत्रफळ , जमिनीची दिशा, मालकी हक्क, स्थान . हे प्रमाणपत्र ई-मोजणी पोर्टल मधून नागरिक अगदी सहजरीत्या काढू शकता आणि पाहू शकतात.
- 7/12 उतारा : 7/12 उतारा हा अतिशय महत्चाचा महसूल रेकॉर्ड आहे , ज्यामुळे मालकी हक्क , लागवड क्षेत्र , जमिनीच्या वापराविषयी माहिती मिळते. 7/12 देखील नागरिक पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पाहू शकतात किवा डाउनलोड करू शकतात.
- 8 अ उतारा : 8 अ उतारा देखील महत्वाचा दस्तऐवज आहे ज्यामुळे जमीनवर केलेल्या पिक लागवडीची माहिती मिळते. जसे कि पिक प्रकार, लागवड क्षेत्र आणि भोगवटदार नाव. 8 अ उतारा देखील नागरिक ई-मोजणी पोर्टल मधून पाहू शकतात किवा डाउनलोड करू शकतात.
- गावातील गावठाण प्रमाणपत्र : गावातील गावठाण विषयी माहिती प्रमाणपत्र देखील ई-मोजणी पोर्टल मधून नागरिक मिळवू शकतात, ज्यामध्ये मालकी हक्क , ठिकाण, क्षेत्रफळ इत्यादी माहिती असते.
- मालमत्तेची मालकी हक्क पडताळणी : मालमत्तेची मालकी हक्क पडताळणी देखील ई-मोजणी मार्फत मिळते , ज्यामुळे मालकी हक्क पडताळणी होते , कायदेशीर व्यवहार आणि वादात उपयोगी पडते.
हि सर्व प्रमाणपत्रे आणि त्यांची पडताळणी करण्यासाठी नागरिकांना पोर्टल वर खाते तयार करून , प्रमाणपत्रे मिळवता येतात. त्यासाठी अर्ज करणे,पेमेंट भरणे इत्यादी समाविष्ट आहे.
अखेर, ई-मोजणी पोर्टल नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रे आणि पडताळणी सहज उपलब्ध करून देते. त्यामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासत नाही.
ई-मोजणी सेवेचा फायदा काय आणि कसा आहे ?
ई-मोजणी चे अनेक फायदे आहेत जे खालील प्रमाणे आहेत.
- वापरण्यास सोप्पे : ई-मोजणी पोर्टल मधील सेवा नागरिकांना वापरण्यास अगदी सोप्या आहे त्यासाठी नागरिक कुठूनही आणि कधीही या सेवेचा फायदा घेऊ शकतात . त्यासाठी त्यांना इंटरनेट , कॉम्प्युटर किवा मोबाईल ची आवश्यकता असते.
- वेळ बचत : या पोर्टल मुळे नागरिकांना घर बसल्या अथवा जिथे असाल तिथून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो त्यामुळे त्यांना सरकारी कार्यालयात जाण्याची गरज पडत नाही , त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि मेहनत वाचते.
- पारदर्शकता आणि वेगवान कार्य : ई-मोजणी मुळे जमिनीविषयक कामांना गती मिळाली सोबत पारदर्शकता भेटली ज्यामुळे कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नाही , व गैरव्यवहार टाळले जातात.
- कामाची गुणवत्ता : या पोर्टलमुळे डाटा एन्ट्री मध्ये होणाऱ्या चुका कमी होऊन काम अचूक पणे पूर्ण होईल.
- फायदेशीर : ई-मोजणी पोर्टल प्रत्यक्षात कागदावर नोंदणी करण्याची गरज पूर्णत नाहीशी करते, त्यामुळे कागदपत्रे जमा करणे , छपाई करणे , वाहतूक खर्च कमी करते
- पर्यावरणास लाभदायक : कागद वापराचे प्रमाण कमी झाल्याने झाडांची होणारी कत्तल पूर्णत कमी होते त्यामुळे निसर्ग हा हिरवागार आणि पुढील पिढीसाठी उपयुक्त ठरेल.
- विविध सेवा : ई-मोजणी पोर्टल एकाच ठिकाणी विविध सेवा नागरिकांना देते त्यामध्ये 7/12 , मालमत्ता नोंदणी , जमीन सर्वेक्षण , मालमत्ता कार्ड अर्ज आणि मालमत्ता प्रमाणपत्र पडताळणी इत्यादी आहे.
- सुरक्षा : ई-मोजणी कार्यप्रणाली हि नागरिकांची पूर्ण माहिती सुरक्षित आणि गोपनीयता ठेवते , त्यासाठी सुरक्षित अश्या प्रणालीचा वापर केला जातो.
अखेर, महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून ई-मोजणी ( e mojni online ) प्रकल्प सुरु करून याचा एकंदरीत सर्व सामान्य नागरिकांना फायदा तर मिळतोच आहे पण त्याचसोबत नागरिकांना आवश्यक असलेले जमिनी संबधित दस्तऐवज जलद व सुरक्षितरित्या मिळत आहे , कारण या पोर्टल मुळे अतिरिक्त शुल्क आणि भ्रष्टाचार यावर पूर्णत आळा घातला असून यामुळे भूमिअभिलेख विभागाची कार्यक्षमता वाढवते.
निष्कर्ष : अखेर,ई-मोजणी ऑनलाईन या सेवेमुळे महाराष्ट्र राज्य सरकार व भूमिअभिलेख विभागात बदल घडून आला आहे. या डिजिटल सेवेमुळे नागरिकांना जमिनी संबधित कामे अगदी सहज आणि सुरक्षित करता येतात. सोबतच अधिक सक्षम व फायदेशीर देखील झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज पूर्णत कमी केली आहे. नागरिकांचा वेळ आणि कष्ट वाचणार आहे, या पोर्टल मुळे जमिनी संबधित कामामध्ये अचूकता आणि भ्रष्टाचार व गैरव्यवहार होण्यावर आळा बसला आहे.निसर्गासाठी अनुकूल असे हे पोर्टल आहे यामुळे कागदाचा वापर कमी होतो आणि झाडाची कत्तल देखील कमी होते.
ई-मोजणी ऑनलाईन या पोर्टलमुळे नागरिकांना मालमत्ता नोद, जमीन सर्वेक्षण, मालमत्ता प्रमाणपत्र, 7/12 उतारा सह मालमत्ता पडताळणी यासारख्या सेवा उपलब्ध आहे. ऑनलाईन कामकाज असल्याने भूमिअभिलेख विभागाच्या कामास अधिक सोयीस्कर आणि जलद बनवते.
एकूणच, ई-मोजणी ऑनलाईन पोर्टल मुळे महाराष्ट्रात डिजिटल क्रांती घडवून आली आहे , सोबत भूमिअभिलेख विभागात देखील डिजिटल क्रांती घडली आहे. ज्यामुळे नागरिकांना जिथे असेल तिथून या सेवांचा उपयोग करून जमिनी संबधित कामे करता येतात.